
कल्याण डोंबिवली मधील चार विधानसभेतील ८० इच्छुक उमेदवारां पैकी १८ उमेदवारानी घेतली माघार....
कल्याण डोंबिवली मधील चार विधानसभेतील ८० इच्छुक उमेदवारां पैकी १८ उमेदवारानी घेतली माघार....
कल्याण डोंबिवली मधील चार विधानसभेतील ८० इच्छुक उमेदवारां पैकी १८ उमेदवारानी घेतली माघार....
कल्याण पश्चिम भाजपचे शहराध्यक्ष वरून पाटील आणि कल्याण पुर्वेतून शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांची बंडखोरी कायम...
कल्याण :- कल्याण डोंबिवली शहरातील कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व, डोंबिवली व कल्याण ग्रामीण या चार विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीला उभे राहन्यासाठी ८० इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज भरले होते अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी १८ उमेदवारांनी चार मतदारसंघातून आपली उमेदवारी मागे घेतली असल्याने ६२ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे राहिले आहे.
कल्याण डोंबिवली मधील चार विधानसभेतील ८० इच्छुक उमेदवारां पैकी कल्याण पश्चिम मधून सहा,कल्याण पूर्वेतील सात,डोंबिवली चार तर कल्याण ग्रामीण एक अश्या चार विधानसभा मतदार संघातून अठरा उमेदवारांनी घेतले अर्ज मागे घेतले आहेत.
कल्याण पश्चिम मतदार संघातून एकूण ३० उमेदवारांनी निवडणुकीसाठी आपले उमेदवारी अर्ज भरले होते त्यापैकी सहा उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे यामध्ये प्रामुख्याने महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या विरोधात भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार व भाजपाचे शहराध्यक्ष वरून पाटील यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी भाजपाच्या पक्षश्रेष्ठींचे आदेशाने उमेदवारी अर्ज मागे घेतला तर भाजपाचे शहराध्यक्ष वरून पाटील यांनी आपला अर्ज पक्ष श्रेष्ठींचा आदेश धुडकावीत उमेदवारी अर्ज कायम ठेवाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला मागे घेतला आहे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी
शिवसेना उध्दव ठाकरे गट महा आघाडीचे अधिकृत उमेदवार सचिन बासरे यांच्या विरोधात भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे तर काँग्रेसचे जिल्हा सचिव राकेश मुथा यांनी बंडखरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला कायम ठेऊन महाआघाडीला आव्हान दिले आहे.
या मतदार संघात महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार विश्वनाथ भोईर महाआघाडीच्या शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार सचिन बासरे ,मनसेचे उल्हास भोईर व भाजपाचे बंडखोर शहराध्यक्ष वरून पाटील यांच्यात चौरंगी लढत होणार आहे.
कल्याण पूर्व मतदार संघातून एकूण २४ उमेदवारांनी निवडणुकीसाठी आपले उमेदवारी अर्ज भरले होते त्यापैकी ७ उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे यामध्ये प्रामुख्याने महाआघाडीच्या शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार धनंजय बोडारे यांच्या विरोधात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता महविकास आघडी व काँगेसच्या पक्षश्रेष्ठींचे आदेशाने सचिन पोटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे रिपाई आठवले गटाचे कल्याण जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी पक्ष श्रेष्ठींचा आदेशाने आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला तर दुसरीकडे भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला कायम ठेवीत भाजपा महायुतीला आव्हान उभे केले आहे कल्याण पूर्व विधान सभा मतदार संघातून निवडणुकीला उभे राहण्यासाठी भरलेल्या २४ उमेदवाराला पैकी सात उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सतरा उमेदवार निवडणूक रिंगणात उभे राहिले आहेत.
डोंबिवलीच्या मतदार संघातून एकूण १२ उमेदवारांनी निवडणुकीसाठी आपले उमेदवारी अर्ज भरले होते त्यापैकी चार उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे त्यामुळे आता या मतदार संघातून आठ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे राहिल्याने खरी लढत महायुतीचे भाजपाचे अधिकृत उमेदवार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व महाविकास आघाडीचे शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार दिपेश म्हात्रे यांच्या होणार आहे
कल्याण ग्रामीण विधान सभा मतदार संघातून एकूण १४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले होते त्या पैकी एका अपक्ष उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता या मतदार संघातून १३ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे राहिले आहेत.खरी लढत मनसेचे विद्यमान आमदार राजू पाटील,महाविकास आघाडीचे शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार सुभाष भोईर,व महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार राजेश मोरे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.
Most Popular News of this Week
शहापूर तालुक्यात भाजपाची...
माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा भाजपामध्ये प्रवेशशहापूर तालुक्यात...