श्रीराम कृष्ण सेवा ट्रस्ट तर्फे अन्न धान्य वाटप
श्रीराम कृष्ण सेवा ट्रस्ट तर्फे अन्न धान्य वाटप
कल्याण : श्रीराम कृष्ण सेवा ट्रस्ट तर्फे गरीब गरजू लोकांना अन्नधान्य वाटप करण्यात येते कल्याण पश्चिम शहरात गेली ३५ वर्ष हा उपक्रम चालू असून अनेक गोरगरीब नागरिक या योजनेचा लाभ घेत असतात. महिन्यातून एकदा हे वाटप केलं जातं. त्याचबरोबर रोज दुपारी भुकेल्या लोकांना जेवण दिले जाते. आधार वाडीच्या लोटस हॉस्पिटल समोर अन्नक्षेत्र असून येथे हे उपक्रम राबविले जातात.
आज 18 जुलै रोजी झालेल्या या उपक्रमात संस्थेचे संचालक जसूभाई चंदाराणा, छबील भाई कारिया, भावेश भाई देसाई, विष्णू कुमार चौधरी, राजीव चंदाराणा, तुषारभाई दाणी, रवी चौधरी, दयाल भाई सजनानी, वंश चंदाराणा, प्रेस क्लबचे सचिव अतुल फडके, अरविंद कपोते आदी मान्यवरांच्या हस्ते अन्नधान्य वितरण करण्यात आले
