पाच वर्षात मी कुटुंबा बाबत शब्दही काढला नाही व भविष्यात काढणारही नाही: उमेदवार संजना जाधव

पाच वर्षात मी कुटुंबा बाबत शब्दही काढला नाही व भविष्यात काढणारही नाही: उमेदवार संजना जाधव

पाच वर्षात मी कुटुंबा बाबत शब्दही काढला नाही व भविष्यात काढणारही नाही: उमेदवार संजना जाधव


सोयगाव;-मी २१ वर्षा पासून कन्नड तालुक्यात फिरतेय माझ्या कुटुंबाबाबत  पाच वर्षापासून मी शब्दही काढला नाही व भविष्यात काढणारही नाही मी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव राजकारणात आली आहे त्या आधी सन २००३ पासून मला निवडणुकीचा अनुभव आहे परंतु तेव्हा पडद्याआड होते आता समोर आली आहे.गेल्या पाच वर्षात अनेक गोष्टी घडल्या माझी बदनामी केली तरीही मी शांत आहे आता फक्त विकास करायचा आहे म्हणून मी रिंगणात आहे असे मत कन्नड-सोयगाव च्या उमेदवार संजना जाधव यांनी शुक्रवारी रात्री झालेल्या महायुती च्या प्रचार सभेत बनोटी येथे केले सोयगावच्या विकासा साठी  मी भोकरदन पॅटर्न राबवून रस्ते वीज आदी प्रलंबित समस्या सोडावेल असेही त्यांनी सांगितले 

   सोयगाव-कन्नड तालुका हा सदैव दहा वर्षांपासून सत्तेच्या बाहेर राहिलेला तालुका आहे त्यामुळे सोयगाव चा विकास झालेला नाही आता राज्यात महायुतीचीच सत्ता येणार असा विश्वास त्यांनी मतदारांना व्यक्त केला त्यामुळ सोयगाव चा विकास होणारच कन्नड-सोयगावला आता पर्यंत आश्वासन देणारे पुरुष आमदार झाले मी एक महिला आहे आणि महिलांनी दिलेला शब्द पूर्णं करतात त्यामुळे संधी द्या असे त्यांनी सांगितले

यावेळी प्रभारी ठगण भागवत ,भाजप तालुकाध्यक्ष सुनील जाधव, शिवसेनेचे नितीन बोरसे,भूषण वेहेळे, आदींनी मनोगत व्यक्त केले सरपंच मुरलीधर पाटील, जयेश बोरसे,दिनेश जाधव, रामराव सपकाळ, आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती....

  

   


Most Popular News of this Week

शहापूर तालुक्यात भाजपाची...

माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा भाजपामध्ये प्रवेशशहापूर तालुक्यात...