नीलम गल्ली बनली जुगाराचा अड्डा

नीलम गल्ली बनली जुगाराचा अड्डा

 नीलम गल्ली बनली जुगाराचा अड्डा

कल्याण (संदीप शेंडगे ): कल्याण रेल्वे स्थानकाच्या परिसरातील नीलम गल्लीमध्ये राजरोसपणे जुगाराचा अड्डा सुरू आहे, या प्रकारामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नीलम गल्ली येथे सुधांशू चेंबर असून येथे अनेक डॉक्टर वकील इंजिनियर आणि विविध कार्यालय, शैक्षणिक क्लासेस सुरू आहेत, याठिकाणी अनेक महिला तसेच विद्यार्थी सातत्याने ये जा करत असतात,  जुगार खेळायला आलेल्या दारूच्या नशेत धुंद असलेल्या लोकांकडून अनेकदा महिलांना छेडछाड झाली आहे. याच ठिकाणी वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला सुद्धा ये जा करतात, त्यामुळे आंबट शौकीन लोकांची या ठिकाणी वर्दळ असते.

दरम्यान, नीलम गल्लीतील जुगार अड्ड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. येथील जुगार अड्ड्यांवर कारवाई करण्यासाठी या अगोदरही समाजसेविका राणी कपोते यांनी उपोषण केले होते, त्यावेळेस काही काळ हे जुगार अड्डे बंद होते मात्र पुन्हा सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

नीलम गल्ली परिसरात व्यापारी, तरुण आणि युवक मोठ्या संख्येने ये-जा करतात. जुगाराच्या व्यसनामुळे आर्थिक नुकसान होऊन अनेक कुटुंब बरबाद झाले आहेत, याचा कौटुंबिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असल्याचा दावा स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारांमुळे कुटुंबातील आर्थिक परिस्थिती बिघडण्याबरोबरच संसार उद्ध्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे

राजकीय दबाव की प्रशासनाचा दुर्लक्ष?

 येथील जुगाराचा अड्डा सुरू असल्याच्या तक्रारी असूनही कारवाई का होत नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणामागे कोणाचा राजकीय दबाव आहे का, किंवा संबंधितांना कोणाचा राजकीय किंवा प्रशासकीय आश्रय आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 

पोलिसांनी तातडीने चौकशी करावी

नीलम गल्ली परिसरातील कथित जुगाराच्या प्रकाराची पोलिसांनी तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी व चौकशी करावी. जुगाराचा अड्डा सुरू असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाची नाहक बदनामी होत आहे बदनामी टाळण्यासाठी पोलिसांनी तात्काळ कठोर पावले उचलून जुगार अड्डा पूर्णपणे बंद करणे गरजेचे आहे.


Most Popular News of this Week

नीलम गल्ली बनली जुगाराचा...

 नीलम गल्ली बनली जुगाराचा अड्डाकल्याण (संदीप शेंडगे ): कल्याण रेल्वे...