MPSC परीक्षेतील गैरप्रकारांची माहिती देण्यासाठी मुदतवाढ
MPSC परीक्षेतील गैरप्रकारांची माहिती देण्यासाठी मुदतवाढ
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विविध परीक्षांमधील कथित गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या चौकशी आयोगाने उमेदवारांना मोठा दिलासा दिला आहे. परीक्षांमधील अनियमितता आणि गैरप्रकारांबाबत माहिती देण्यासाठी अर्ज व प्रतिज्ञापत्र सादर करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे.
यापूर्वी उमेदवारांना 16 नोव्हेंबर 2026 पर्यंत आपली माहिती सादर करण्याची अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र आता ही मुदत वाढवून 23 नोव्हेंबर 2026 करण्यात आली आहे.
MPSC च्या नऊ परीक्षांमधील कथित अनियमिततेची चौकशी करण्यासाठी हा आयोग कार्यरत आहे. ज्या उमेदवारांकडे परीक्षांमधील गैरप्रकारांबाबत पुरावे, कागदपत्रे किंवा महत्त्वाची माहिती आहे, त्यांना ती चौकशी आयोगाकडे सादर करता येणार आहे.
या निर्णयामुळे संबंधित उमेदवारांना आपली बाजू मांडण्यासाठी आणखी सात दिवस मिळणार आहेत. त्यामुळे MPSC परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे या चौकशीकडे लक्ष लागले आहे.
Most Popular News of this Week
डोंबिवलीत दफनभूमीच्या...
डोंबिवलीत दफनभूमीच्या मागणीसाठी मुस्लिम समाजाची बैठकडोंबिवली -...
MPSC परीक्षेतील गैरप्रकारांची...
MPSC परीक्षेतील गैरप्रकारांची माहिती देण्यासाठी मुदतवाढमुंबई : महाराष्ट्र...
