दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला सुप्रिया सुळेंचा पूर्णविराम!

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला सुप्रिया सुळेंचा पूर्णविराम!

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला सुप्रिया सुळेंचा पूर्णविराम! 

मुंबई  महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी आज महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर आता पूर्णविराम दिल्याचे स्पष्ट केले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आणण्याबाबत चर्चा सुरू होती. यासंदर्भात बैठकाही झाल्या होत्या. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर विलीनीकरणाचा विषय माझ्यासाठी आणि माझ्या पक्षासाठी संपला आहे.

'विलीनीकरणाच्या चर्चांचा आता मला कंटाळा आला आहे. अजितदादा असताना या विषयावर चर्चा झाली होती. मात्र, त्यांच्या निधनानंतर या विषयाला मी पूर्णविराम दिला आहे. यापुढे या विषयावर बोलणार नाही,' अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या गटाकडून सुरू असलेल्या राजकीय हालचाली आणि वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी यावर भाष्य करताना सुळे यांनी हा त्या पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचे सांगितले.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सत्तेत सहभागी होण्याचा प्रश्नच येत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सुप्रिया सुळे यांच्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना मोठा धक्का बसला असून आगामी काळात राज्यातील राजकीय समीकरणे कोणते वळण घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Most Popular News of this Week

डोंबिवलीत दफनभूमीच्या...

डोंबिवलीत दफनभूमीच्या मागणीसाठी मुस्लिम समाजाची बैठकडोंबिवली -...

दोन्ही राष्ट्रवादीच्या...

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला सुप्रिया सुळेंचा...

MPSC परीक्षेतील गैरप्रकारांची...

MPSC परीक्षेतील गैरप्रकारांची माहिती देण्यासाठी मुदतवाढमुंबई : महाराष्ट्र...