
रश्मी शुक्ला पुन्हा पोलीस महासंचालकपदी
रश्मी शुक्ला पुन्हा पोलीस महासंचालकपदी
मुंबई:- राज्याच्या पोलीस महासंचालक पदी पुन्हा एकदा रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात गृह विभागाकडून फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी रश्मी शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. त्यानंतर ५ नोव्हेंबर रोजी महासंचालक पदी संजय कुमार वर्मा यांना पदभार देण्यात आला होता. आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याने पुन्हा रश्मी शुक्ला यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा पदभार देण्यात आला आहे.
Most Popular News of this Week
शहापूर तालुक्यात भाजपाची...
माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा भाजपामध्ये प्रवेशशहापूर तालुक्यात...