चिमुकली वरील लैंगिक अत्याचार, दोषींवर कारवाई करावी

चिमुकली वरील लैंगिक अत्याचार, दोषींवर कारवाई करावी

चिमुकली वरील लैंगिक अत्याचार, दोषींवर कारवाई करावी- आमदार राजेश मोरे 

डोंबिवली - कल्याण ग्रामीण मतदार संघातील आडीवली परिसरात इमारतीत खेळणाऱ्या एका 9 वर्षाच्या मुलीशी इमारतीत राहणाऱ्या पांडे नावाच्या इसमाने अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी बोलताना आमदार राजेश मोरे यांनी या प्रकरणाची सखल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत 

आडीवली परिसरात एका इमारतीत रात्रीच्या सुमारास खेळत असलेल्या 9 वर्षांच्या मुलीला घरात ओढून घेत तिच्याशी लगट करणाऱ्या पांडे याला जाब विचारण्यासाठी गेलेल्या या चिमुरडीच्या आई वडील आणि आजीला पांडे दांपत्याने शिवीगाळ धक्काबुक्की केल्याचा प्रकार शनिवारी रात्रीच्या सुमारास घडला होता याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार मोरे यांनी केली आहे याबाबतच्या सूचना मानपाडा पोलिसांना दिल्याचे त्यांनी सांगितले.


Most Popular News of this Week

शहापूर तालुक्यात भाजपाची...

माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा भाजपामध्ये प्रवेशशहापूर तालुक्यात...