अधिकाधिक सदस्य नोंदणीसाठी नियोजनबध्द अभियान राबवा -

अधिकाधिक सदस्य नोंदणीसाठी नियोजनबध्द अभियान राबवा -

अधिकाधिक सदस्य नोंदणीसाठी नियोजनबध्द अभियान राबवा - माजी आमदार नरेंद्र पवार 

कल्याण : भारतीय जनता पक्षाकडून राज्यस्तरावर सदस्यता नोंदणी अभियान राबविण्यात येत असून ठाणे विभागीय क्षेत्रामध्ये अधिकाधिक सदस्यता नोंदणी होण्यासाठी नियोजनबध्द कार्यक्रम आखण्याच्या सूचना भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाचे ठाणे शहर जिल्हा प्रभारी आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केल्या. राज्य पातळीवरील या सदस्य नोंदणी मोहिमेअंतर्गत भारतीय जनता पक्षाच्या ठाणे जिल्हा विभागीय कार्यालयात सदस्यता नोंदणी कार्यशाळा संपन्न झाली. त्यामध्ये उपस्थित भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पवार यांनी विविध सूचना केल्या.

केंद्र सरकारकडून सुरू असलेली गतिमान विकासकामे आणि दूरगामी परिणामकारक ध्येयधोरणांची अंमलबजावणी केली जात आहे. या गोष्टींनी प्रेरित होऊन देशभरात अनेकजण भारतीय जनता पक्षाचे सदस्य होण्यासाठी स्वतःहून पुढे येत आहेत. या पार्श्वभूमीवर आपण समाजातील शेवटच्या घटकापर्यंत हे सदस्य नोंदणी अभियान घेऊन जाण्याची गरजही माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी व्यक्त केली. 

तर येत्या काळात प्रस्तावित असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता त्यासाठीही प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागले पाहीजे. आणि त्यासाठी हे सदस्य अभियान अत्यंत महत्त्वाचे असून परिणामकारक अमंलबजावणीसाठी त्याची नियोजनबध्द आखणी करण्याच्या सूचनाही पवार यांनी उपस्थित भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या. 

यावेळी ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, नौपाडा मंडल अध्यक्ष विकास घांगेकर, भटके विमुक्त प्रदेश उपाध्यक्ष बाळा केंद्रे, माजी नगरसेवक सुनीलजी हंडोरे, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष सुरेश पाटील, प्रभाग क्रमांक १२चे अध्यक्ष विलास हरपाळ, प्रभाग क्रमांक २१ चे अध्यक्ष रोहित गोसावी, प्रभाग क्रमांक २२ चे अध्यक्ष प्रतीक सोळंकी यांच्यासह शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपास्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संवाद नेहमीच ठरतो प्रेरणादायी

दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या 117 व्या "मन की बात" कार्यक्रमाद्वारे देशवासीयांशी संवाद साधला. भाजपच्या ठाणे शहर जिल्हा विभागीय कार्यालयात जिल्हाध्यक्ष संजय वाघुले आणि इतर महत्त्वाच्या पदाधिकारी - कार्यकर्त्यांसह माजी आमदार नरेंद्र पवार यांनीही हा "मन की बात" कार्यक्रम ऐकण्याचा लाभ घेतला. या 117 व्या कार्यक्रमाद्वारे नरेंद्र मोदी यांनी प्रकाश स्तंभाप्रमाणे मार्गदर्शक असणारे भारतीय संविधान, देशातील नागरिकांच्या आरोग्यक्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणारी आयुष्यमान भारत योजना, वर्ल्ड ऑडियो व्हीज्यूव्हल एंटरटेंमेंट समिट, एकतेतून अनेकतेचे प्रतीक असलेला महाकुंभ, मलेरियाच्या लढाईत मिळवलेले यश अशा अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा संवाद कार्यक्रम भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यासाठी प्रेरणादायी असल्याचे मतही माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी व्यक्त केले.


Most Popular News of this Week

शहापूर तालुक्यात भाजपाची...

माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा भाजपामध्ये प्रवेशशहापूर तालुक्यात...