पुस्तक रसग्रहण हे आनंददायी असावं - ज्येष्ठ रंगकर्मी सुरेश पवार

पुस्तक रसग्रहण हे आनंददायी असावं - ज्येष्ठ रंगकर्मी सुरेश पवार

पुस्तक रसग्रहण हे आनंददायी असावं - ज्येष्ठ रंगकर्मी सुरेश पवार 

कल्याण सार्वजनिक वाचनालय कल्याणच्यावतीने “वाचन संकल्प महाराष्ट्राचा”(१ जाने.२०२५ ते १५ जाने २०२५)या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या सयुंक्त विद्यमाने पु.भा.भावे व्याख्यानमाले अंतर्गत सदर उपक्रम राबविण्यात येत आहे. कोणत्याही पुस्तकाचे रसग्रहण टीकात्मक  किवा स्तुतीपर नसावंतर ते आनंददायी असावं. लेखकाच्या साहित्यकृतीतील लेखन जसच्या तसं घेण्याला मर्यादा आहेतपुस्तकाचे मुखपृष्ठ,मलपृष्ठप्रस्तावना,मनोगतआवृत्ती व प्रकाशन वर्ष यांचा सारासार विचार करणे रसग्रहणात अत्यंत महत्वाचे असते. एखादया साहित्यकृतीवर लेखन करण्यापूर्वी त्या साहित्याचे किमान पाच ते सहा वेळा वाचन करावे असे मत प्रमुख वक्ते ज्येष्ठ रंगकर्मी सुरेश पवार यांनी रसिक वाचकांपुढे मांडले, 


 एखादया कथेचे कुतूहल मनात घर करते, तेव्हाच विद्यार्थी वाचनाकडे वळतात. त्यासाठी  श्रवणही अत्यंत महत्त्वाचे असते. आनंदाने वाचल्यास झोप येत नाही. रोज एक तरी कथा/गोष्ट वाचावी असे मोलाचे मार्गदर्शन प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ साहित्यिका, प्रवचनकार प्राची गडकरी यांनी विद्यार्थांना  सामुहिक वाचन,कथन स्पर्धेप्रसंगी केले. सामुहिक वाचनात शारदा विद्यामंदिर या शाळेने सहभाग नोंदविला. प्राची खापरे ह्या विद्यार्थिनीच्या “पुशी चालली लंडनला”या कथेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.

 काही पुस्तकांचे रसग्रहण स्वान्तसुखाय असाव असं स्पष्ट मत तरुण वाचक प्रदिप चौरे यांनी मांडले.काही वेळा पुस्तकाची प्रस्तावना दीर्घ असली तरी त्याचे वाचन गरजेचे गरजेचे आहे असे मत तरुण वाचक मेघन पेटकर यांनी चर्चेत मांडले.

प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कथा दडलेली असते त्यासाठी माणसं वाचावीत. त्याचा उपयोग पुस्तक वाचताना निश्चितच होतो.वाचनालयाच्या सर्व स्पर्धांमागे वाचकांना वाचना सोबतच लिहितं करण्याचा एकमेव  हेतू असतो असे मत वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर यांनी मांडले. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सदर  कार्यक्रम पार पडले. प्रसंगी वाचनालयाच्या उपाध्यक्ष आशा जोशी,कार्यकारिणी सदस्य अरविंद शिंपी ग्रंथसेविका व रसिक वाचक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.      


Most Popular News of this Week

वरळी येथे 158 निरंकारी भक्तांचे...

वरळी येथे 158 निरंकारी भक्तांचे रक्तदानकल्याण : ‘रक्त नाड्यांमध्ये वाहावे,...

सुभाष मैदानातील इनडोअर...

सुभाष मैदानातील इनडोअर गेमच्या हॉलचे काम  क्रीडा प्रेमींनी पाडले...

गावठाणचा प्रश्न कायमस्वरूपी...

 गावठाणचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार; वनमंत्री गणेश नाईकउरण : उरण नवी...

केडीएमसीच्या सिटी पार्क...

केडीएमसीच्या सिटी पार्क येथील चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त...

Epaper 16/01/2025

केडीएमसीच्या सफाई मित्र...

केडीएमसीच्या सफाई मित्र यांच्याकरिता प्रशिक्षणाचे आयोजनकल्याण : कल्याण...