रस्ते अपघात 2024 मध्ये 1.80 लाख जणांचा मृत्यू

रस्ते अपघात 2024 मध्ये 1.80 लाख जणांचा मृत्यू

रस्ते अपघात 2024 मध्ये 1.80 लाख जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना कॅशलेस उपचार मिळू शकणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कॅशलेस उपचार योजनेची घोषणा केली. याअंतर्गत अपघातग्रस्तांच्या सात दिवसांच्या उपचारासाठी दीड लाख रुपयांचा खर्च सरकार उचलणार आहे. अपघातानंतर 24 तासांच्या आत पोलिसांना माहिती दिल्यास उपचाराचा खर्च सरकार उचलेल, असे गडकरी म्हणाले.

यासोबतच ‘हिट अँड रन’ प्रकरणातील पीडितांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांपर्यंतची भरपाईही त्यांनी जाहीर केली. रस्ते अपघातात 2024 मध्ये 1.80 लाख मृत्यू झाले आहेत. रस्ते सुरक्षा ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे गडकरी म्हणाले. 2024 मध्ये अंदाजे 1.80 लाख लोकांनी रस्ते अपघातात आपला जीव गमावला. त्यापैकी 30 हजार मृत्यू हेल्मेट न घातल्याने झाले आहेत. तसेच, 66 टक्के अपघात हे 18 ते 34 वयोगटातील लोकांसोबत झाले आहेत.


Most Popular News of this Week

शहापूर तालुक्यात भाजपाची...

माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा भाजपामध्ये प्रवेशशहापूर तालुक्यात...