वेश्या व्यवसाय - टोळीवर पोलिसांचा छापा

वेश्या व्यवसाय - टोळीवर पोलिसांचा छापा

वेश्या व्यवसाय - टोळीवर पोलिसांचा छापा

कल्याण : कल्याण पाश्चिमेतील महात्मा फुले चौक पो.स्टे.च्या हद्दीमध्ये कल्याण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मोठया प्रमाणामध्ये वेश्या व्यवसाय चालु असल्याबाबत वेळोवेळी नागरिकांकडुन तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींचे गार्भीय लक्षात घेउन कल्याण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये वेश्या व्यवसाय करणा-या व करून घेणा-या महिलांवर कायदेशिर कार्यवाही करण्याकरीता अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या आदेशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी पोलीस पथक तयार केले होते.

कल्याण रेल्वे स्टेशन परीसरात भिंवडी बस स्टॉपच्या पाठीमागे मोकळया जागेत कल्याण प. येथे तीन महिला शेठाणी व एक पुरूष हे काही पिडीत महिलांना वेश्याव्यवसायासाठी प्राप्त करून, त्यांना पैशाचे आमिष दाखवुन त्यांना शरीरसंबंधासाठी मुलींची मागणी करणा-या ग्राहकांसोबत पाठवुन ग्राहकांसोबत शरीरसंबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडुन त्यांचेकडुन वेश्याव्यवसाय करवुन घेत आहेत. अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी याबाबत वरिष्ठांना माहिती देउन पोलीस पथकास कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. 

त्याप्रमाणे पोलीस पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करून तीन महिला शेठाणी व एक पुरूष तसेच एकुण १३ पिडीत महिला यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर पोहवा मनोहर चित्ते यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्याने यातील महिला आरोपीत नामे १) मर्जिना मंडळ २) विमलेश उर्फ पिंकी गुप्ता ३) सरस्वती पांडे व पुरूष आरोपी प्रशांत गायकवाड यांच्या विरोधात महात्मा फुले चौक पो. स्टे. येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन या गुन्हयामध्ये एकुण १३ पिडीत महिलांना ताब्यात घेउन त्यांना सुरक्षिततेकामी महिला सुधारगृह, उल्हासनगर ५ येथे जमा करण्यात आले आहे. या गुन्हयाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे हे करीत आहेत.


Most Popular News of this Week

डॉ. आंबेडकरांचा काँग्रेसने...

डॉ. आंबेडकरांचा काँग्रेसने केला अपमान, भाजपाने राखला सन्मान       ...

शहापूर तालुक्यात भाजपाची...

माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा भाजपामध्ये प्रवेशशहापूर तालुक्यात...