काशी विश्वनाथ परिसरात मांसाहारी दुकानांवर बंदी
काशी विश्वनाथ परिसरात मांसाहारी दुकानांवर बंदी
वाराणसी – वाराणसी येथील काशी विश्वेश्वर मंदिराच्या 2 किलोमीटर परिसरातील सर्व मांस-मासळी विकणार्या दुकानांवर प्रतिबंध लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. उत्तर प्रदेशातील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक दुकानदारांनी मात्र या निर्णयाला विरोध केला आहे.
उत्तर प्रदेशातील काशी विश्वेश्वराचे मंदिर हे हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. येथे लाखो भाविक येत असतात. या मंदिरात येणार्या भाविकांच्या भावनांचा विचार करून त्याचप्रमाणे परिसरातील स्वच्छतेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. नगर परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, त्यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले आहे. आदेशात म्हटले आहे की, दोन किलोमीटर परिघातील सर्व मांस व मासळी विकणारी दुकाने परिघाच्या बाहेर नेण्यात यावीत. दुकानात मांस लटकवून त्याची विक्री करू नये. हा आदेश स्थायी असून, भविष्यातही या परिसरात अशा प्रकारच्या कोणत्याही दुकानांना परवानगी दिली जाणार नाही. या आदेशाचे पालन न करणार्यांवर गुन्हे नोंदवण्यात येतील.
दरम्यान या दुकानदारांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, आम्ही गेल्या 30 वर्षांपासून इथे दुकान लावत आहोत. आमच्याकडे परवाने असून, त्यासाठीचे शुल्कही आम्ही भरत आहोत. आम्ही स्वच्छतेच्या नियमांचे पालन करू. आतापर्यंत कधीही दुकानांवर आक्षेप घेण्यात आला नव्हता. गेल्या दोन-तीन वर्षांपासूनच हे सुरू झालेले आहे. त्यांनी आमचे 2 किलोमीटर परिसराच्या बाहेर पुनर्वसन करावे. अद्याप आम्हाला अधिकृतपणे कोणतीही नोटीस वा आदेश प्राप्त झालेले नाहीत.
Most Popular News of this Week
सुभाष मैदानातील इनडोअर...
सुभाष मैदानातील इनडोअर गेमच्या हॉलचे काम क्रीडा प्रेमींनी पाडले...
वरळी येथे 158 निरंकारी भक्तांचे...
वरळी येथे 158 निरंकारी भक्तांचे रक्तदानकल्याण : ‘रक्त नाड्यांमध्ये वाहावे,...
गावठाणचा प्रश्न कायमस्वरूपी...
गावठाणचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार; वनमंत्री गणेश नाईकउरण : उरण नवी...
केडीएमसीच्या सिटी पार्क...
केडीएमसीच्या सिटी पार्क येथील चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त...
केडीएमसीच्या सफाई मित्र...
केडीएमसीच्या सफाई मित्र यांच्याकरिता प्रशिक्षणाचे आयोजनकल्याण : कल्याण...