
पाच कोटी ८५ लाख रुपयांची वीजचोरी, ८५३ वीज चोरट्यांना कारवाईचा दणका
पाच कोटी ८५ लाख रुपयांची वीजचोरी, ८५३ वीज चोरट्यांना कारवाईचा दणका
पाच कोटी ८५ लाख रुपयांची वीजचोरी, ८५३ वीज चोरट्यांना कारवाईचा दणका
ठाणे : पाच कोटी ८५ लाख रुपयांची वीजचोरी महावितरणच्या भांडुप परिमंडळात अधिक हानी असलेल्या वीज वाहिन्यांवर गेल्या पाच महिन्यांमध्ये व्यापक शोध मोहीम राबवून तब्बल ८५३ वीज चोरट्यांना कारवाईचा दणका देण्यात आला. यावेळी पाच कोटी ८५ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आणण्यात ‘महावितरण’च्या पथकाला यश आले आहे.
अधिक हानी असलेल्या ६० वीज वाहिन्यांवरील सदोष मीटर बदलणे, नवीन वीज जोडणी, कमकुवत वीजतारा बदलणे आदी विविध उपाय योजनांमुळे महसुलांमध्ये तब्बल ४० लाख १४,५४१ युनिट वीजेची भर पडली आहे.
ऑगस्ट ते डिसेंबर २०२४ दरम्यान आखण्यात आलेल्या उपाय योजनांमध्ये ठाणे मंडळ कार्यालयांच्या अंतर्गत २५८ वीज चोरट्यांविरुद्ध कारवाई करून एक कोटी ७९ लाख रुपयांची वीज चोरी उघडकीस आणण्यात आली आहे.
वाशी मंडळ कार्यालयातील ४०२ जणांकडे तीन कोटी ४७ लाख रुपयांची वीज चोरी सापडली. परिणामी ठाणे मंडळात १० लाख २७,०६७ युनिट आणि वाशी मंडळात सर्वाधिक २१ लाख ७९,४६१ आणि पेण मंडळात आठ लाख ८०१३ युनिट वीजेची वाढ नोंदवण्यात आली आहे.
मुख्य अभियंता सुनिल काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी मंडळाचे अधिक्षक अभियंता संजय पाटील, ठाणे मंडळाचे अधीक्षक अभियंता युवराज मेश्राम आणि पेण मंडळाचे अधिक्षक अभियंता राजाराम माने यांच्या नेतृत्वाखाली अभियंते, अधिकारी, जनमित्रांच्या चमुने ही कामगिरी केली.
Most Popular News of this Week
शहापूर तालुक्यात भाजपाची...
माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा भाजपामध्ये प्रवेशशहापूर तालुक्यात...