तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक
तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक
मुंबई : रेल्वे रुळ, सिग्नल यंत्रणा आणि विविध अभियांत्रिकी कामांसाठी मध्य रेल्वेने रविवारी (ता.१९) मुख्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. तर पश्चिम रेल्वेने दिवसा ब्लॉक घेतल्याने कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या प्रवाशांची काहीशी गैरसोय होणार आहे.
मध्य रेल्वेने माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० पर्यंत ब्लॉक घेतला आहे. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.५८ ते दुपारी ३.१० या वेळेत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा येथे डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांवर थांबतील. या गाड्या आपल्या नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील. ठाणे येथून सकाळी ११.२५ ते दुपारी ३.२७ या वेळेत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. तर या लोकल मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांवर थांबून माटुंगा येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.
ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे वाशी/नेरूळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप व डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा ब्लॉक कालावधीत रद्द राहतील.
Most Popular News of this Week
वरळी येथे 158 निरंकारी भक्तांचे...
वरळी येथे 158 निरंकारी भक्तांचे रक्तदानकल्याण : ‘रक्त नाड्यांमध्ये वाहावे,...
सुभाष मैदानातील इनडोअर...
सुभाष मैदानातील इनडोअर गेमच्या हॉलचे काम क्रीडा प्रेमींनी पाडले...
गावठाणचा प्रश्न कायमस्वरूपी...
गावठाणचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार; वनमंत्री गणेश नाईकउरण : उरण नवी...
केडीएमसीच्या सिटी पार्क...
केडीएमसीच्या सिटी पार्क येथील चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त...
केडीएमसीच्या सफाई मित्र...
केडीएमसीच्या सफाई मित्र यांच्याकरिता प्रशिक्षणाचे आयोजनकल्याण : कल्याण...