
रोहा स्थानकावर थांबणार दहा एक्स्प्रेस
रोहा स्थानकावर थांबणार दहा एक्स्प्रेस
मुंबई : मध्य रेल्वेने प्रवाशांच्या मागणीनुसार रोहा स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर दहा गाड्यांना थांबे देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. शनिवार (ता. २५) पासून रोहा स्थानकात पुढील नावे दिलेल्या एक्स्प्रेस थांबविण्यात येणार आहेत.ट्रेन क्रमांक ११०९९ लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगाव एक्स्प्रेस ही २६ जानेवारी रोजी रोह स्थानकात थांबेल. तसेच १११०० मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस २५ जानेवारी रोजी, २२६२९ दादर-तिरुनेलवेली एक्स्प्रेस ३० जानेवारी, २२६३० तिरुनेलवेली - दादर एक्स्प्रेस ३० जानेवारी रोजी, १२२१७ कोचुवेली-चंदिगड एक्स्प्रेस २६ जानेवारी रोजी, १२२१८ चंदिगड कोचुवेली एक्स्प्रेस ३० जानेवारी, २०९३१ कोचुवेली - इंदूर एक्स्प्रेस २५ जानेवारी रोजी, हिसार- २०९३२ कोइम्बतूर एक्स्प्रेस २९ जानेवारी रोजी, २२४७५ कोइम्बतूर-हिसार एक्स्प्रेस ३० जानेवारी रोजी आणि २२४७६ कोइम्बतूर-हिसार एक्स्प्रेस २६ जानेवारी रोजी रोहा स्थानकात थांबेल.
Most Popular News of this Week
डॉ. आंबेडकरांचा काँग्रेसने...
डॉ. आंबेडकरांचा काँग्रेसने केला अपमान, भाजपाने राखला सन्मान ...
शहापूर तालुक्यात भाजपाची...
माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा भाजपामध्ये प्रवेशशहापूर तालुक्यात...