
कल्याणच्या शिवप्रेमी माघी गणेशोत्सवात यंदा तिरुपती बालाजी मंदिराचा भव्य देखावा
कल्याणच्या शिवप्रेमी माघी गणेशोत्सवात यंदा तिरुपती बालाजी मंदिराचा भव्य देखावा
कल्याणच्या शिवप्रेमी माघी गणेशोत्सवात यंदा तिरुपती बालाजी मंदिराचा भव्य देखावा
कल्याण : कल्याण पश्चिमेतील सर्वात जुना सार्वजनिक माघी गणेशोत्सव अशी ओळख असलेल्या उंबर्डे येथील शिवप्रेमी माघी गणेशोत्सवामध्ये यंदा दक्षिणेतील श्री तिरुपती बालाजी मंदिराचा भव्य देखावा साकारण्यात येणार आहे. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने गेल्या 30 वर्षांपासून हा माघी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या स्वरूपात तो साजरा करण्यात येणार आहे.
दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हाप्रमूख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या उंबर्डे कोळिवली उपविभागीय शाखेतर्फे गेल्या 3 दशकांपासून हा गणेशोत्सव साजरा केला जात आहे. गेल्यावर्षी याठिकाणी साकारण्यात आलेल्या अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती पाहण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. केवळ कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरातीलच भाविक नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून हजारो भाविक याठिकाणी दर्शनासाठी येत असतात.
यंदा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दक्षिण भारतातील श्री तिरुपती बालाजीच्या मंदिराचा भव्य देखावा उभारण्यात आला असल्याची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधी जयवंत भोईर यांनी दिली. येथील स्व. आत्माराम भोईर चौकात तब्बल 70 फूट उंच आणि 60 फूट लांबीच्या आकाराचे तिरुपती बालाजी मंदिर याठिकाणी साकारण्यात आले असून गेल्या महिन्याभरापासून दिवस रात्र त्याचे काम सुरू होते. त्यासोबतच स्व. व्ही.बी.भोईर चौक ते आत्माराम भोईर चौकापर्यंत सुंदर अशी विद्युत रोषणाई करण्यासह वेगवेगळे देखावेही उभारण्यात आले आहेत.
याठिकाणी उद्या विराजमान होणाऱ्या गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आणि सुंदर देखावा पाहण्यासाठी लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार विश्वनाथ भोईर, जयवंत भोईर, प्रभूनाथ भोईर, गणेशोस्तव समितीचे अध्यक्ष भरत भोईर यांच्यासह संपूर्ण आयोजन समितीतर्फे करण्यातआले आहे.
Most Popular News of this Week
शहापूर तालुक्यात भाजपाची...
माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा भाजपामध्ये प्रवेशशहापूर तालुक्यात...