85 वर्षांवरील 166 ज्येष्ठ नागरिक, तर 36 दिव्यांग मतदारांनी केले गृहमतदान

85 वर्षांवरील 166 ज्येष्ठ नागरिक, तर 36 दिव्यांग मतदारांनी केले गृहमतदान

85 वर्षांवरील 166 ज्येष्ठ नागरिक, तर 36 दिव्यांग मतदारांनी केले गृहमतदान


     ठाणे :- येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी होत असलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये मतदानाचा टक्का वाढावा व मतदानापासून कोणीही नागरिक वंचित राहू नये, यासाठी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही 85 वर्षांवरील व दिव्यांग नागरिक जे मतदान केंद्रापर्यत पोहोचू शकत नाही अशा मतदारांसाठी घरुनच मतदान करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातून गृहमतदानासाठी एकूण 933 जणांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी दि.8 व 9 नोव्हेंबर 2024 या दोन दिवसात 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार मिळून एकूण 202 मतदारांनी गृहमतदानाचा हक्क बजावला आहे. 

     गृहमतदानास दि.8 नोव्हेंबर 2024 पासून सुरूवात झाली असून दि.17 नोव्हेंबरपर्यत हे मतदान प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नेमून दिलेल्या तारखांदिवशी त्या त्या मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. 40 टक्के अंपगत्व (Locomotive) व 85 वर्षांवरील वृद्ध यांच्याकरिता भारत निवडणूक आयोगामार्फत 12 D नमुना भरून घरूनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्या इच्छुक मतदारांनी विधानसभा निवडणुक 2024 ची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे 12 D फॉर्म भरून दिले होते त्यांनाच या गृहमतदानाचा लाभ घेता येणार आहे.

     ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील 143 डोंबिवली विधानसभा मतदारसंघ व 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात शुक्रवार, दि.8 नोव्हेंबर 2024 रोजी गृहमतदान पार पडले. या दोन्ही विधानसभा मतदारसंघातून 85 वर्षांवरील एकूण 77 ज्येष्ठ मतदारांनी तर 6 दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

    

    


Most Popular News of this Week

वरळी येथे 158 निरंकारी भक्तांचे...

वरळी येथे 158 निरंकारी भक्तांचे रक्तदानकल्याण : ‘रक्त नाड्यांमध्ये वाहावे,...

सुभाष मैदानातील इनडोअर...

सुभाष मैदानातील इनडोअर गेमच्या हॉलचे काम  क्रीडा प्रेमींनी पाडले...

गावठाणचा प्रश्न कायमस्वरूपी...

 गावठाणचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार; वनमंत्री गणेश नाईकउरण : उरण नवी...

केडीएमसीच्या सिटी पार्क...

केडीएमसीच्या सिटी पार्क येथील चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त...

Epaper 16/01/2025

केडीएमसीच्या सफाई मित्र...

केडीएमसीच्या सफाई मित्र यांच्याकरिता प्रशिक्षणाचे आयोजनकल्याण : कल्याण...