
केडीएमसी कर वसुली थंडावली, आयुक्त करतात काय
केडीएमसी कर वसुली थंडावली, आयुक्त करतात काय?
अवघ्या चार महिन्यात चारशे कोटी हून अधिक वसुली?
कल्याण :- कल्याण डोंबिवली महानगर पालिकेला कर रुपी मिळणाऱ्या महसूला व्यतिरीक्त कोणतेच उत्पन्नाचे साधन नसल्याने पालिकेची सर्व भिस्त ही मुख्यतः मालमत्ता कर वसुली वर आहे.
मागील चार महिन्या पासून शासनाच्या विविध योजना,विधान सभा निवडणुका आदी कामा मध्ये करा विभागातील अधिकारी व कर्मचारी व्यस्त असल्याने त्याचा परिणाम कर वसुलीवर होऊन कर वसली जवळपास ठप्प झाली अवघ्या चार महिन्यात मालमत्ता कर वसुली नव्वद कोटी रुपये पार करू शकली नसल्याने
पालिकेचे आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघ्या चार महिन्यांचा कालावधी उरला असून या चार महिन्यात अंदाजे चारशे कोटी हुन अधिक रुपयांची कर वसुली करावी लागणार असल्याने कर वसुलीचे उद्दिष्टे पार करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.कर वसुलीची विस्कळित झालेली आर्थिक गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी पालिका प्रशासन अलर्ट झाले आहे. कर वसुलीच्या उद्दिष्टा पर्यंत पोहचण्यासाठी तात्पुरती सवलत दिली असून त्याने पुढील नववर्षात कर वसुली थडक पणे राबविण्यासाठी मालमत्ता सिल करणे,जप्ती ,लिलाव प्रक्रिया आदी कठोर कारवाई राबविणार असल्याने ॲक्शन मोड वर आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे प्रमुख उत्पन्नाचे स्त्रोत हे मालमत्ता कर व नगर रचना विभाग कडून मिळणाऱ्या बांधकाम परवानगी शुल्कातून मिळणाऱ्या कर रुपी महसुलातून आहे या दोन्ही विभागातून कर रुपी जमणाऱ्या पैशातून पालिकेच्या कर्मचाऱ्याचा पगार व शहरातील विकास कामावर खर्च केला जातो.गेल्या दीन दीड वर्षात पालिका क्षेत्रात राज्य शासन व केंद्र सरकारने विविध प्रकल्प व विकास कामांना कोट्यावधी रुपयांचा निधी दिल्याने पालिकेच्या निधीतून केल्या जाणाऱ्या विकास कामावर होणाऱ्या आर्थिक खर्चाचा मोठ्या प्रमाणावर ताण कमी झाला होता. पालिकीची भिस्त ही मालमत्ता कराच्या कर वसुली वर असल्याने यंदाच्या आर्थिक वर्षाच्या बजेट मध्ये पालिका प्रशासनाने कर विभागाला अंदाजे सव्वा सहाशे सहाशे कोटी रुपये कर वसुलीचे उद्दिष्ट दिले होते . आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या एप्रिल ते जुलै या चार महिण्यात मालमत्ता कर १२१ कोटी जमा झाला होता त्या नंतर मात्र पुढील ऑगस्ट,सप्टेंबर ,ऑक्टोंबर व नोव्हेंबर या चार
महिन्याच्या कालावधीत सण,उत्सव ,शासनाच्या विविध योजनां राबविणे तसेच विधान सभा निवडणुकां आदी कामात व्यस्त असल्याने पालिकेचे कर वसुली कमालीची थंडावली होती या चार महिन्यात मालमत्ता कर वसून ९७ कोटी झाल्याने ती शंभरी ही पार करू शकली नाही .मागील आठ महिन्याच्या कालावधीत अवघ्या २१८ कोटी रुपये मालमत्ता वसुली करण्यात कर विभागाला धन्यता मानावी लागली आहे.त्यामुळे पालिकेचे आर्थिक गणिते बिघडली असून पालिकेच्या बजेट मध्ये कर विभागाला दिलेले कर वसुलीचे उद्दिष्ठ गाठताना कर विभागाला नाकी नऊ येणार आहेत आर्थिक वर्ष संपायला एव्हढे चार महिन्यांचा कालावधी उरला असल्याने या चार महिन्यात चारशे कोटी हुन अधिक रुपयांची कर वसुली करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.कर वसुली साठी पालिका प्रशासन अलर्ट झाले आहे.पालिका प्रशासनाने सर्व प्रभागातील कर संकलन विभागाची विशेष बैठक घेऊन कर वसुली साठी कठोर उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत
मालमत्ताधारकांना आर्थिक वर्षाच्या दुस-या सहामाही कराची रक्कम ३१ डिसेंबर, २०२४ पुर्वी भरल्यास ४ टक्के सवलत व ऑनलाईन २ ट क्के सवलत देण्याचे जाहीर केले आहे.त्या नंतर कर वसुली प्रभावी पणे राबविली जाणार असून या मध्ये थकबाकीदार मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आली आहे.कराचा भरणा करण्यास टाळाटाळ करणा- यांवर थकीत रक्कमेवर दर महिन्याला २ टक्के रक्कमेची दंडात्मक कारवाई करणे, नळजोडणी खंडीत करणे, मालमत्ता जप्ती करणे, अटकावणी करणे यासारखी कारवाई करण्यात येईल. या कारवाईनंतर थकीत कराची वसुली न झाल्यास मालमत्तांचा जाहिर लिलाव करुन त्याव्दारे थकीत कराची वसुली करण्यात येणार आहे तसेच कर वसुली च्या कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कार्यवाहीचा बडगा उचलला जाणार असल्याची माहिती कर विभागा कडून मिळाली आहे
Most Popular News of this Week
शहापूर तालुक्यात भाजपाची...
माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा भाजपामध्ये प्रवेशशहापूर तालुक्यात...