मे महिना अखेरीस अमृत योजनेची कामे पूर्ण होतील – आमदार सुलभा गायकवाड

मे महिना अखेरीस अमृत योजनेची कामे पूर्ण होतील – आमदार सुलभा गायकवाड

मे महिना अखेरीस अमृत योजनेची कामे पूर्ण होतील – आमदार सुलभा गायकवाड

कल्याण : अमृत योजनेअंतर्गत जलकुंभ उभारणी तसेच पाणीपुरवठा विकास कामांना गती मिळाली असून  मे महिना अखेरीस अमृत योजनेची कामे पूर्ण होऊन कल्याण पूर्वेतील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी समस्येतून दिलासा मिळणार असल्याचे कल्याण पूर्वच्या भाजपा आमदार सुलभा गायकवाड यांनी सांगितले. आमदार गायकवाड यांनी आज कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातील अमृत योजनेच्या कामांची पाहणी केली यावेळी त्या बोलत होत्या.

कल्याण पूर्व मतदार संघातील तिसगांव, काटेमानिवली, नांदिवली, माणेरे तसेच १०० फुटी रोड येथील "अमृत जलकुंभ योजना" १ व २ अंतर्गत सुरू असलेल्या जलकुंभ उभारणीच्या कामाची आमदार सुलभा गायकवाड यांनी पाहणी केली. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका युद्धपातळीवर हे काम करत असून, मे महिन्याच्या अखेरपर्यंत कल्याण पूर्वेतील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेश कुलकर्णी यांनी याबाबत माहिती दिली आणि वेळेत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

ही योजना पूर्णत्वास गेल्यावर नागरिकांना शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा होईल. प्रशासनाशी सातत्याने समन्वय साधत जलप्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असून नागरिकांच्या मूलभूत सुविधा सुनिश्चित करणे हाच माझा प्राधान्यक्रम असल्याचे सुलभा गायकवाड यांनी

तर अमृत योजनेमध्ये केडीएमसी क्षेत्रात एकूण 28 जलकुंभ उभारले जात असून यापैकी कल्याण पूर्वेत 9 जलकुंभ आहेत. अमृत योजनेचे काम 70 टक्के झालं असून  मार्च 2025 पर्यंत काम होणं अपेक्षित होतं मात्र प्रशासकीय मान्यता जानेवारीत मिळाल्याने 6 महिने मुदत वाढ मिळाली आहे.  नंदिवली येथे दीड लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी असून  याची हायड्रोलीक टेस्टिंग मार्च पर्यंत होणार असल्याची प्रतिक्रिया कार्यकारी अभियंता शैलेश कुलकर्णी यांनी दिली.


Most Popular News of this Week

शहापूर तालुक्यात भाजपाची...

माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा भाजपामध्ये प्रवेशशहापूर तालुक्यात...