
हॅशटॅग आगरीनबोला चॅलेंज अमेरिकेतही
हॅशटॅग आगरीनबोला चॅलेंज अमेरिकेतही
कल्याण : मराठीच्या बोली भाषा जपल्या तर आपोआप मराठी भाषा टिकेल आणि स्थानिकांनी आपली बोली भाषा सोडली वा प्रमाण भाषेत बोलणाऱ्यांनी नेहमी बोली भाषेत बोलणाऱ्यांना कमी लेखत आले म्हणून त्यांना सोडावी लागली असे म्हणत सर्वेश तरे यांनी ‘आगरीन बोला’ चॅलेंज हा उपक्रम सुरु केला आहे.
या उपक्रमात ते स्वतः विविध दुकानदारांशी अन इतर मंडळींशी आगरी बोलीत बोलून त्यावर समोरच्यांची काय प्रतिक्रिया मिळते हे पाहिली अन समोरच्यांनी सुध्दा आगरी बोलीत बोलुन सकारात्मक प्रतिसाद दिला. याच अनुषंगाने
मुळ गडब-पेणच्या अन सध्या अमेरिकेतील फ्लोरिडा या शहरात स्थायिक असलेल्या उज्वला पाटील यांनी आगरीन बोला चॅलेंज उपक्रमात सहभाग घेतला असुन त्या समाजमाध्यमात आगरी भाषेत बोलून सध्या ‘पाटील इन अमेरिका’ अन ‘अलिबागची पाटलीन’ नावाने गाजत असुन त्यांचे तब्बल ३८ हजार फोलोवर्स झाले आहेत.
उज्वला पाटील या उच्चशिक्षित असुन एमबीए, हॉस्पिटल मॅनेजमेंट आणि टेक्नॉलॉजीमध्ये पदवी मिळवली आहे. सध्या त्या अमेरिकेत सॉफ्टवेअर टेस्टर आणि प्रोग्रामर म्हणुन काम करीत आहेत. नुकताच त्यांनी #आगरीनबोलाचॅलेंज उपक्रमात सहभाग घेऊन आगरी भाषेत पाककृतीचा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम समाज माध्यमात टाकून ‘अमेरिकेशी मी आगरी भाशा जपाचा प्रयत्न करते,आपली आगरी-कोळी भाशा जपाची आसल त जापालाच लागल’ असे म्हणत आपली बोली भाषा बोलण्याचा अन जपण्याचा त्यांनी संदेशदिला आहे.
Most Popular News of this Week
डॉ. आंबेडकरांचा काँग्रेसने...
डॉ. आंबेडकरांचा काँग्रेसने केला अपमान, भाजपाने राखला सन्मान ...
शहापूर तालुक्यात भाजपाची...
माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा भाजपामध्ये प्रवेशशहापूर तालुक्यात...