
भिवंडी लोकसभा जलवाहतुकीच्या कामांना वेग,
भिवंडी लोकसभा जलवाहतुकीच्या कामांना वेग
भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील नागरिकांच्या जलद प्रवासासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले असून, `सागरमाला' अंतर्गत भिवंडी लोकसभा मतदारसंघातील जेट्टींच्या कामांसाठी निधी मंजूर झाला आहे. त्यातून काल्हेर, अंजूर दिवे, डोंबिवली, कल्याण येथील जेट्टींची कामे वेगाने होणार असून, नागरिकांचे खाडीतील प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मोठ्या प्रमाणावरील वाहतूकीच्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी २०१४ पासून कल्याण ते भिवंडी-ठाणे मार्गे वसईपर्यत जलवाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यानुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली होती. त्यातून `इन लॅण्ड वॉटर ट्रान्सपोर्ट' हा प्रकल्प साकारला होता. या विषयासंदर्भात केंद्रीय परिवहन मंत्रालयात जुलै २०१७ मध्ये बैठक झाली होती. या बैठकीत प्रकल्पाचा पहिला टप्पा मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार काल्हेर, अंजूर दिवे, कल्याण पश्चिममध्ये जेट्टी मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर या जेट्टीचे कामे सुरू झाली होती.
आता या कामांना वेग आला असून, रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होण्यासाठी केंद्र सरकारने सागरमाला योजनेंतर्गत जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्याचे ठरविले आहे. त्यातून प्रवासी जलवाहतूकीसह रो-रो सेवेद्वारे मालवाहतूक करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून प्रत्येकी ५० टक्के निधी दिला जाईल. त्यानुसार संपूर्ण कोकणातील ११ जेट्टी व टर्मिनल बांधण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने १०० कोटी रुपयांचा दुसरा हप्ता मंजूर करण्यात आला आहे.
Most Popular News of this Week
शहापूर तालुक्यात भाजपाची...
माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा भाजपामध्ये प्रवेशशहापूर तालुक्यात...