डॉ. आंबेडकरांचा काँग्रेसने केला अपमान, भाजपाने राखला सन्मान
डॉ. आंबेडकरांचा काँग्रेसने केला अपमान, भाजपाने राखला सन्मान
मुंबई : संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने वारंवार अपमान केला तर भारतीय जनता पार्टीने अनेक कृतींमधून बाबासाहेबांचा सन्मान राखला. विरोधकांनी बाबासाहेब, संविधान आणि भारतीय जनता पार्टी बाबत पसरवलेल्या खोट्या नरेटिव्हला छेद देत कार्यकर्त्यांनी सर्वांपर्यंत सत्य पोहोचवावे असे आवाहन केंद्रीय विधी आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी शुक्रवारी केले. प्रदेश भाजपातर्फे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘सन्मान अभियान’ कार्यशाळेत मेघवाल बोलत होते. यावेळी प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष व माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, अनुसूचित जाती मोर्चा मुंबईचे अध्यक्ष शरद कांबळे, भाजपा प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, ज्येष्ठ नेते भाई गिरकर, ‘सन्मान अभियान’ चे संयोजक भरत पाटील, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.
यावेळी मेघवाल म्हणाले की, भारतरत्न सन्मान, संविधान गौरव यात्रा, पंचतीर्थ तसेच दीक्षाभूमी विकास, सेंट्रल हॉलमध्ये बाबासाहेबांचे तैलचित्र लावणे यांसह अनेक कृतींतून भाजपाने बाबासाहेबांप्रति असलेला आदर दर्शवला आहे. काँग्रेसने कायम बाबासाहेबांचा द्वेष केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणुकीत पराभव करण्यापासून ते संविधान सभेत काम करताना काँग्रेसने बाबासाहेबांना राज्यघटनेत समस्त मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी, सर्वांगीण विकासासाठी हव्या तशा तरतुदी करू दिल्या नाहीत यांचा उल्लेख करत काँग्रेसवर शरसंधान साधले.
यावेळी चव्हाण म्हणाले की, संविधानाची निर्मिती करून बाबासाहेबांनी देशाचा सर्वांगीण विकास आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीचा मार्ग घालून दिला. बाबासाहेबांचे विचार पुढे नेत प्रत्येक घटकाचा विकास आणि सामाजिक सलोखा राखणे हे भाजपाचे ध्येय आहे. आपला देश अखंड रहावा आणि जातीधर्मात फूट पडू नये यासाठी भाजपा झटत असताना दुसरीकडे विरोधक मात्र देशाबाहेरील तसेच देशातील विघातक शक्तींना हाताशी घेत देशाच्या अखंडतेला बाधा पोहोचवत आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याने वाडीवस्तीपर्यंत जाऊन बाबासाहेबांचे विचार तसेच संविधानाप्रति भाजपाची असलेली कटीबद्धता लोकांपर्यंत पोहोचवावी असे आवाहन श्व्हाण यांनी केले.
या अभियानाअंतर्गत राज्यभरात 15 दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेमध्ये 13 ते 25 एप्रिल दरम्यान राज्यभर आयोजण्यात येणा-या कार्यक्रमांची आखणी व चर्चा करण्यात आली. 13 एप्रिल ला राज्यभरातील डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमा, स्मृतीस्थळे आणि आसपासच्या परिसराची स्वच्छता करण्यात येईल, 14 एप्रिल डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीदिनी ठिकठिकाणी अभिवादन कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
