
शहापूर तालुक्यात भाजपाची संघटनात्मक स्थिती मजबूत
माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा भाजपामध्ये प्रवेश
शहापूर तालुक्यात भाजपाची संघटनात्मक स्थिती मजबूत
शहापूर : माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या पुढाकाराने शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. शहापूर तालुक्याच्या राजकीय वर्तुळात ५० वर्षांपासून सक्रिय असलेले बरोरा कुटुंबियांच्या भाजपामधील प्रवेशामुळे, शहापूर तालुक्यात भाजपाची संघटनात्मक स्थिती मजबूत झाली आहे.
भाजपाच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बरोरा यांच्यासह शहापूर तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. शहापूर विधानसभा मतदारसंघाचे २००४ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार म्हणून पांडुरंग बरोरा यांनी प्रतिनिधीत्व केले होते. तर त्यांचे वडील स्व. महादू बरोरा यांनी १९८० नंतर चार वेळा शहापूर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळविला होता. त्यामुळे शहापूरच्या राजकारणात बरोरा कुटुंबियांची राजकीय ताकद महत्वाची मानली जाते. २०२४ च्या निवडणुकीत बरोरा यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला होता. मात्र, त्यांचा अवघ्या १६०० मतांनी पराभव झाला होता.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. त्यातून विविध पक्षातील कार्यकर्त्यांचे भाजपामध्ये प्रवेश होत आहेत. काही दिवसांपूर्वी शहापूर तालुक्यातील महत्वाच्या वासिंद व बिरवाडी ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच यांनी ग्रामपंचायत सदस्य आणि शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला होता. आता माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या प्रवेशाने आगामी जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपाची ताकद वाढणार आहे.
पांडुरंग बरोरा यांच्यासमवेत ज्येष्ठ नेते शिवाजीभाऊ देशमुख, आगरी क्रांती संघटनेचे अध्यक्ष शिवाजी अधिकारी, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक इंद्रजित पडवळ, जिल्हा परिषदेचे माजी सभापती निखिल बरोरा, माजी सभापती दिपाली झुगरे, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस महिला (अजित पवार गट) काजल घोलप, ज्येष्ठ नेते पुंडलिक शिर्के, भास्कर बरोरा, रघुनाथ विशे, सोमनाथ काबाडी, जयराम वारघडे, विठ्ठल फर्डे, किशोर खंबाळकर, मनीष निचिते, अशोक जाधव, प्रकाश देशमुख, पंकज धानके, संजय विशे, धीरज झुगरे, राहुल भोईर, सागर विशे, पांडुरंग मोकाशी, प्रदीप चव्हाण, मनोज धानके, कुमार भोईर, राम पांढरे, निखिल घोलप, उंबरखांडचे सरपंच तुकाराम वड, तळवाडचे सरपंच अंकूश बरतड, सावरोलीचे सरपंच मधुकर निरगुडा, दहीगावचे सरपंच भास्कर आरे, नांदगावचे सरपंच जयवंत वाख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात जनहिताच्या योजनांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक स्तरातील नागरिकांच्या प्रगतीला वेग आला आहे. त्यातून विविध पक्षांतील नेते व कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करीत आहेत. माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या प्रवेशाने भाजपाची शहापूर तालुक्यात संघटनात्मक स्थिती मजबूत झाली आहे, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनीव्यक्त केली.
Most Popular News of this Week
शहापूर तालुक्यात भाजपाची...
माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा भाजपामध्ये प्रवेशशहापूर तालुक्यात...