Breaking News

समन्वय प्रतिष्ठान तर्फे विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप.

समन्वय प्रतिष्ठान तर्फे विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप.

समन्वय प्रतिष्ठान तर्फे विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप.

कल्याण :- शिक्षण घेण्याची जिद्द आणि चिकाटी मनात ठेऊन नियमित अभ्यास केल्यास यशाचे शिखरावर सहज पोचता येते. शिक्षणाची गोडी निर्माण करुन निमित अभ्यास केला पाहिजे असा मोलाचा संदेश देऊन आर्थिक क्षमतेने शिक्षणापासून विद्यार्थी अलिप्त राहू नये म्हणून सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्याने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करीत असल्याचे प्रतिपादन समन्वय प्रतिष्ठानचे संस्थापक अॅड. जनार्दन टावरे यांनी केले.

मुरबाड तालूक्यातील अति दुर्घम भागातील जि. प. शाळा देवराळवाडी या शाळेत समन्वय प्रतिष्ठान तर्फे गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच शिक्षकांचे संकल्पनेने याप्रसंगी शाळा परीसरात वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना निसर्ग मित्र केदार शेरे यांनी सांगितले की, जास्तीत जास्त प्रमाणात वृक्षांची लागवड झाल्यास नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्यास मदत होईल. प्रत्येकाने दरवर्षी एक तरी वृक्षाची लागवड केल्यास पर्यावरणात चांगले बदल होईल आणि प्रदुर्षणामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही. त्यावर उपाय योजना म्हणून प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवड करणेबाबत माहिती दिली. यावेळी दोन्ही शाळेतील एकुण ४६ विद्यार्थ्यांना संपुर्ण शालेय साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने करण्यात आली.

याप्रसंगी बृन्हमुंबई महानगरपालिकेचे प्रकल्प अधिकारी सुभाष सांबरे, कुणाल शिंदे, प्रकाश देवदेकर, शाळेतील शिक्षक किरण गोरले, समन्वय प्रतिष्ठानचे प्रविण मालूसरे, संतोष खेताडे, शंकर पाटील, मंगेश टेंबे, गुरुनाथ भोईर, शेखर सावंत, प्रमोद थूल, अमोल जाधव, किरण शिरसाठ, सुहास मोहळ, गणेश मंजूळे, उपस्थित होते.


Most Popular News of this Week