
कल्याणातील फडके मैदानातील खुल्या नाल्यामुळे खेळाडूच्या आरोग्याला धोका
कल्याणातील फडके मैदानातील खुल्या नाल्यामुळे खेळाडूच्या आरोग्याला धोका
कल्याणातील फडके मैदानातील खुल्या नाल्यामुळे खेळाडूच्या आरोग्याला धोका
कल्याण :- कल्याण पश्चिमेकडील फडके मैदान व बगीचा असून त्याच्या लगतच असलेल्या खुल्या नाल्यामुळे खेळाडूच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून सदरचा खुला नाला बंदिस्त करावा अशी मागणी मोहन उगले यांनी पालिका आयुक्तांना निवेदन द्वारे केली आहे.
कल्याण पश्चिमे कडील लाला चौकी परिसरात फडके मैदान असून या मैदानात खेळाचे मैदान व बगीचा आहे. खळाच्या मैदानात कबड्डी,क्रिकेट तसेच अन्य विविध खेळ खेळण्यासाठी खेळाडू मोठ्या प्रमाणावर येत असतात मैदानाचा परिसर विस्तीर्ण असल्याने ज्येष्ठ नागरिक तसेच आजू बाजूच्या परिसरातील नागरिक जॉगिंग ट्रेक वर जॉगिंग साठी येत असतात तसेच या मैदानाच्या बाजूला लहान मुलांना खेळण्यासाठी बगीचां असल्याने बागीच्यातील खेळण्या मध्ये खेळांसाठी व फिरण्यासाठी गर्दी असते . या मैदान व बगीचा लगतच असलेल्या खुल्या नाल्यामुळे त्याचा परिणाम नागरिकाच्या आरोग्यावर होत आहे. जागतिक सर्वेक्षणा नुसार मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण पसरले असून त्या अनुषंगाने ताप,सर्दी ,खोकला आदी संसर्गजन्य साथीच्या आजाराचां फैलाव होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टी कोनातून सदरचा खुला नाला बंदिस्त करावा अशी मागणी मोहन उगले यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
Most Popular News of this Week
शहापूर तालुक्यात भाजपाची...
माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा भाजपामध्ये प्रवेशशहापूर तालुक्यात...