राष्ट्रीय आट्या पाट्या स्पर्धेसाठी ठाणे जिल्ह्यातील खेळाडू व प्रशिक्षक निवड

राष्ट्रीय आट्या पाट्या स्पर्धेसाठी ठाणे जिल्ह्यातील खेळाडू व प्रशिक्षक निवड

राष्ट्रीय आट्या पाट्या स्पर्धेसाठी ठाणे जिल्ह्यातील खेळाडू व प्रशिक्षक निवड

कल्याण : ठाणे जिल्हा आट्या पाट्या असोसिएशन चे अध्यक्ष आप्पा शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य आट्या पाट्या महामंडळाच्या मान्यतेने ४ ते ६ नोव्हेंबर दरम्यान ३७ वी पुरुष व ३४ वी महिला सिनियर महाराष्ट्र राज्य आट्या पाट्या अजिंक्यपद स्पर्धा खडवली, कल्याण येथे आयोजित करण्यात आली होती. 

या स्पर्धेतून ठाणे जिल्ह्यातील पुरुष गटातून एजाज तडवी, चारुदत्त काळे यांची आणि महिला गटातून वैभवी चव्हाण, अनुराधा मोरे यांची आट्या पाट्या फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित ३ ते ५ जानेवारी दरम्यान, शेगाव , बुलढाणा येथे होणाऱ्या ३७ वी पुरुष ३३ वी महिला सिनियर राष्ट्रीय आट्या पाट्या अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ठाणे जिल्हा आट्या पाट्या असोसिएशन सचिव, मार्गदर्शक व राष्ट्रीय पंच संजय काळे यांची महाराष्ट्राच्या महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड झाली. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेल्या ठाणे जिल्ह्यातील सर्वांचे अध्यक्ष आप्पा शिंदे तसेच सर्व पदाधिकऱ्यांनी विशेष कौतुक केले. 


Most Popular News of this Week

शहापूर तालुक्यात भाजपाची...

माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा भाजपामध्ये प्रवेशशहापूर तालुक्यात...