
आकाशात ध्वज फडकवत शिवाजी महाराजांना मानवंदना
आकाशात ध्वज फडकवत शिवाजी महाराजांना मानवंदना
कल्याण : आकाशात ध्वज फडकवत आंतरराष्ट्रीय स्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांना साहसी मानवंदना देण्यात आली आहे. कल्याण मधील कोळीवली गावातील कुस्तीपटु कै बळीराम कारभारी यांचे सुपुत्र अजित कारभारी यांनी ब्रिगेडियर सौरभ सिंह शेखावत (नि.) यांच्या प्रोहस्ताहनाने रशिया मधील एरोग्लॅड कोलम्ना येथे - ३६°C तापमानामध्ये एल ४१० या हवाई जहाजातुन ५१००मीटर (१६,७३२ फुट) आकाशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा ध्वज फडकवत छत्रपती शिवाजी महाराजांना साहसी मानवंदना देत प्रथम भारतीय नागरिक ठरले.
कर्नल कोस्त्या क्रिवोशिव (२७००० जंप मास्टर- रशियन आर्मी स्कायडाइव मुख्य प्रशिक्षक - आर्मी बेस) व आमेचे मित्र आनी यूनाइटेड स्टेट पैराशूट एसोसिएशन (अमेरिका) चे स्काईडाइविंग प्रशिक्षक राहुल देसाई (डकरे) यांच्या मार्गदर्शनाखाली अजित कारभारी यांनी साहसी कामगिरी यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्यांच्या या कामगिरी बद्दल सर्वच स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे
.
Most Popular News of this Week
डॉ. आंबेडकरांचा काँग्रेसने...
डॉ. आंबेडकरांचा काँग्रेसने केला अपमान, भाजपाने राखला सन्मान ...
शहापूर तालुक्यात भाजपाची...
माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा भाजपामध्ये प्रवेशशहापूर तालुक्यात...