
कल्याण आयमेथॉनमध्ये 12 परदेशी धावपटू समावेश
कल्याण आयमेथॉनमध्ये 12 परदेशी धावपटू समावेश
कल्याण : अवघ्या पाच वर्षांमध्ये आपल्या उत्कृष्ट आयोजन - नियोजनामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर विदेशातील धावपटूंमध्ये प्रसिद्ध झालेली इंडीयन मेडीकल असोसिएशनची यंदाची आयमेथॉन रेकॉर्डब्रेक ठरली. आयएमए कल्याण, कल्याण रनर्स ग्रुप आणि केडीएमसीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित यावर्षीच्या आयमेथॉन 5 मध्ये आफ्रिका, केनिया, इथिओपिया, नायजेरिया देशांमधील 12 धावपटूही त्यामध्ये सहभागी झाले होते. यावेळी तब्बल 7 हजारांहून अधिक धावपटूंनी सहभाग घेत कल्याण डोंबिवलीत नवा इतिहास रचला.
केडीएमसीच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, डीसीपी अतुल झेंडे, केडीएमसी उपायुक्त संजय जाधव, महाराष्ट्र आयएमए अध्यक्ष डॉ. संतोष कदम, कल्याण आयएमए अध्यक्षा डॉ. सुरेखा ईटकर, शिक्षणतज्ज्ञ बिपिन पोटे, डॉ. आश्विन कक्कर, सुनिल चव्हाण, अमित सोनावणे, विकास जैन, डी.बी.जाधव, आयएमए कल्याणचे विकास सुरंजे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या आयमेथॉनला झेंडा दाखवून प्रारंभ केला.
कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौकातून सुरू झालेली ही आयमेथॉन 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर अशा चार गटांमध्ये आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये कल्याण डोंबिवलीसह ठाणे, मुंबई, दिल्ली, पंजाब, हरियाणा आदी राज्यांसह आफ्रिकेच्या केनिया, इथिओपिया, नायजेरिया देशांमधील 12 धावपटूही त्यामध्ये सहभागी झाले होते. तर केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड, डी सी पी अतुल झेंडे, उपायुक्त संजय जाधव, डॉ. प्रशांत पाटील आदींनी या आयमेथॉनमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. विशेष म्हणजे कल्याणच्या इतिहासात एखाद्या मॅरेथॉनमध्ये इतक्या मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कल्याण आयएमएचे डॉ.आश्विन कक्कर, समीर पाटील, डॉ. विकास सुरंजे, डॉ. राजेश राजू, डॉ. अमित बोटकुंडले, डॉ.शुभांगी चिटणीस, डॉ. सोनाली पाटील यांच्यासह संपूर्ण कल्याण आयएमए टीमने विशेष मेहनत घेतली.
या स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आले. यावेळी केडीएमसीचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी ऊर्जा बचत आणि संवर्धनाबाबत सादर केलेल्या जनजागृतीपर कार्यक्रमाला उपस्थितांनी मोठी दाद दिली.
Most Popular News of this Week
शहापूर तालुक्यात भाजपाची...
माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा भाजपामध्ये प्रवेशशहापूर तालुक्यात...