
केडीएमसीच्या सिटी पार्क येथील चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
केडीएमसीच्या सिटी पार्क येथील चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
केडीएमसीच्या सिटी पार्क येथील चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
कल्याण : कल्याण पश्चिमेतील सिटी पार्कमध्ये महापालिका विजय ॲड्स आणि अविष्कार फाऊंडेशन यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेस जवळ-जवळ 1300 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग दर्शवून भरघोस प्रतिसाद दिला. सिटी पार्कच्या निसर्गरम्य वातावरणात शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या चित्रकला स्पर्धेत सहभागी होवून चिमुकल्या बालगोपालांनी आपल्या कुंचल्याने नयनरम्य रंगांची उधळण करीत चित्रकला स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटला.
या चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा खासदार सुरेश म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. खासदार सुरेश म्हात्रे यांनी सहभागी बालचमूची प्रशंसा केली आणि विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी अशा स्पर्धा यापुढेही आयोजित करण्यात याव्यात, असे निर्देश उपस्थित अधिका-यांना दिले. महापालिकेतर्फे अशा स्पर्धांचे आयोजन भविष्यातही करण्यात येईल, असे आश्वासन महापालिकेचे माहिती व जनसंपर्क विभागाचे उपआयुक्त संजय जाधव यांनी आपल्या भाषणात दिले.
यावेळी परिमंडळ-3 चे पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे, माजी पोलीस उपआयुक्त सचिन गुंजाळ, कल्याणचे तहसिलदार सचिन शेजाळ व इतर मान्यवर उपस्थित होते. आविष्कार फाऊंडेशनचे विनोद शेलकर यांनी या स्पर्धेचे सुयोग्य नियोजन केले.
Most Popular News of this Week
शहापूर तालुक्यात भाजपाची...
माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा भाजपामध्ये प्रवेशशहापूर तालुक्यात...