‘समृद्ध ग्रंथालय, संगणक प्रयोगशाळा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा व टेलीविजन संच’ उद्घाटन सोहळा

‘समृद्ध ग्रंथालय, संगणक प्रयोगशाळा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा व टेलीविजन संच’ उद्घाटन सोहळा

‘समृद्ध ग्रंथालय, संगणक प्रयोगशाळा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा व टेलीविजन संच’ उद्घाटन सोहळा

 कल्याण : सप्तशृंगी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै. गजानन हिरू पाटील विद्यामंदिर, मातोश्री शेवंताबाई गजानन पाटील माध्यमिक विद्यालय व कै. गजानन हिरू पाटील इंग्लिश स्कूल, अटाळी या शाळेमध्ये ‘समृद्ध ग्रंथालय, संगणक प्रयोगशाळा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा व टेलीविजन संच’ उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. सदर उद्घाटन श्रीमती ललिता दहितुले, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे यांच्या हस्ते संपन्न झाले.


 आगमनावेळी लेझीम व ढोल पथकासह सचिव / मुख्याध्यापक गणेश गजानन पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर शालेय विद्यार्थीनीनी सुरेल ईशस्तवन सादर केले व फीत कापून शिक्षणाधिकारी श्रीमती ललिता दहितुले यांनी ग्रंथालय व प्रयोगशाळेचे उद्घाटन केले. त्यानंतर शाळेचे प्रास्ताविक, पाहुण्यांचा सत्कार, प्रमुख पाहुण्यांचे भाषण व अध्यक्षीय भाषण इ. कार्यक्रम झाले.

याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक गणेश गजानन पाटील यांनी प्रास्तविकामध्ये शाळेच्या प्रगतीचा आलेख मांडला. तसेच उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमाचा मूळ उद्देश उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करणे, असे सांगितले. तसेच कार्यक्रमाला लाभलेले पाहुणे मधुकर घोरड, उपशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद ठाणे यांनी आपल्या भाषणात शाळेचे कौतुक केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात श्रीमती ललिता दहितुले यांनी पालकांना उद्देशून विद्यार्थ्यांप्रती असलेली पालक म्हणून आपली जबाबदारी मांडली . तसेच त्यांनी संस्था, संस्था अध्यक्ष नारायण गजानन पाटील, संस्था सचिव व शाळा मुख्याध्यापक गणेश गजानन पाटील यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचे कौतुक केले. 

नव्या ग्रंथालयात शैक्षणिक व मनोरंजनात्मक पुस्तकांचा खजिना उपलब्ध आहे, तर संगणक प्रयोगशाळा व विज्ञान प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांना तांत्रिक व शास्त्रीय कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय, टेलीविजन संचाच्या साहाय्याने शैक्षणिक व्हिडिओ व डिजिटल शिक्षणाचा लाभ घेता येईल.

या कार्यक्रमास राजकीय, सामाजिक, शिक्षण अशा विविध क्षेत्रातून अनेक मान्यवर व पालक उपस्थित होते. श्रीमती ललिता दहितुले (शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे), मधुकर घोरड (उपशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे), प्रशांत भामरे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य छत्रपती शिक्षक संघटना, कोकण विभाग), अनिल पाटील (अध्यक्ष, मुंबई विभागीय, मुख्याध्यापक संघ), लायन. व्ही.एन. गिरी (लायन्स क्लब ऑफ कल्याण), वासुदेव पाटील (युवक अध्यक्ष, ठाणे जिल्हा, कोळी समाज), शाम मधुकर मिरकुटे (अध्यक्ष, कल्याण परिसर, कोळी समाज), अंबादास पाटील (अध्यक्ष- वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ), प्रविण लोंढे (सचिव, ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघ, ठाणे) तसेच पाठक सर, हनुमान तरे, मुकेश पाटील, दशरथ तरे, भानुदास मडके सर, प्रकाश मगर सर, भाऊसाहेब पानसरे सर, लायन डी. के रेलीया , विलास रंधवे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका हर्षाली दीपक नेमाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.


Most Popular News of this Week

शहापूर तालुक्यात भाजपाची...

माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा भाजपामध्ये प्रवेशशहापूर तालुक्यात...