Breaking News

घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता कर माफी नाही : आयुक्त अभिनव गोयल

घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता कर माफी नाही : आयुक्त अभिनव गोयल

घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता कर माफी नाही : आयुक्त अभिनव गोयल

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन फी म्हणून 900 रुपये वसुली करण्यास सुरुवात केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने व उभाटा सेनेने करदात्या नागरिकांची सहानुभूती मिळविण्यासाठी मोर्चा काढून 300 रुपयांची वाढीव फी रद्द करावी अशी मागणी केली, मात्र आज झालेल्या पत्रकार परिषदेत आयुक्त अभिनव गोयल यांनी वाढीव फी रद्द केली जाणार नसल्याचे जाहीर केले, 

राज्य शासनाच्या निर्देशन नुसार महापालिकेत घनकचरा व्यवस्थापन साठी महापालिकेने निधी जमा करावयाचा असून त्या साठी राज्य वा केंद्र सरकार कोणताही निधी देणार नसल्याने, पालिकेने घनकचरा व्यवस्थापन फी 600 रुपयावरून 900 रुपये केल्याने राजकीय पक्षामध्ये एकच खळबळ माजली व विरोध सुरू झाला, 

मात्र महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने आयुक्तांच्या परवानगीने वाढीव कर असलेली बिले पाठविली असून वसुली सुरू केली आहे, 

आज झालेल्या पत्रकार परिषद मध्ये पत्रकारांनी घनकचरा व्यवस्थापन फी वाढीबद्दल विचारले असता आम्ही वाढ केली आहे, या राज्य सरकारचा काही संबंध नाही, आम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे, असे सांगून निर्णय बदलणार नसल्याचे सूतोवाच केले, 

घनकचरा व्यवस्थापन फी रद्द करण्यासाठी राजकीय पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांना न्याय मागण्यासाठी न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे जाणवते.कल्याण डोंबिवली महापालिकेला जनतेची नाहीतर फक्त न्यायालयाचीच भाषा समजते अशी प्रतिक्रिया श्रीनिवास घाणेकर यांनी दिली.


Most Popular News of this Week