Breaking News

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर

सोनारपाडा जंक्शन येथे होणार उड्डाणपुलाची उभारणी

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर


डोंबिवली : डोंबिवली शहरातील वाहतूक व्यवस्थेला अधिक गती देण्यासाठी शहरात विविध ठिकाणी रस्ते, उड्डाणपूल यांचे बांधकाम पूर्णत्वास गेले आहे. याच पार्श्वभूमीवर आता डोंबिवली शहरातील सागाव - मानपाडा रस्त्यावरील अत्यंत वर्दळीचे आणि सतत वाहनांनी गजबजलेल्या सोनारपाडा जंक्शन येथे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. यामुळे या जंक्शन भागातील वाहतुकीला अधिक गती मिळणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या पुलाच्या उभारणीसाठी १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.  भाजपा आमदार रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे हे यासाठी सातत्याने आग्रही होते.


Most Popular News of this Week