केडीएमसीच्या सफाई मित्र यांच्याकरिता प्रशिक्षणाचे आयोजन

केडीएमसीच्या सफाई मित्र यांच्याकरिता प्रशिक्षणाचे आयोजन

केडीएमसीच्या सफाई मित्र यांच्याकरिता प्रशिक्षणाचे आयोजन

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभाग, जल नि:सारण- मल नि:सारण विभाग यांच्या वतीने व दिव्यस्वप्न फांऊडेशन, कोल्हापूर यांच्या सहाय्याने स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ अंतर्गत महापालिकेच्या कल्याण (प.) येथील आधारवाडी एसटीपी प्रकल्प येथे ड्रेनेज मध्ये काम करणाऱ्या सफाई मित्र यांच्याकरिता प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रशिक्षणाकरता जवळपास ५० सफाई मित्र उपस्थित होते. या प्रशिक्षणामध्ये उपस्थित सफाई मित्र यांना ड्रेनेज मध्ये काम करताना घ्यावयाची काळजी, काम करताना पीपीई किट वापर प्रात्यक्षिक व त्याचे महत्त्व, वैयक्तिक स्वास्थ्य सुरक्षा, मॅन्युअल स्कॅवेंजर ॲक्ट २०१३ बद्दल माहिती देण्यात आली. त्याचबरोबर सफाई मित्र यांच्याकरीता लाभदायक असलेल्या शासकीय योजनांबाबत विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

दिव्यस्वप्न फाउंडेशनच्या प्रशिक्षक ऐश्वर्या जोशी, शिवराज जाधव व अमर लोखंडे यांच्या मार्फत हे प्रशिक्षण संपन्न करण्यात आले असून या प्रशिक्षणा दरम्यान महापालिकेच्या मल नि:सारण विभागाचे कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगूळ, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता योगेश गोटेकर, कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) राजू राठोड यांच्यासह मलनि:सारण विभागातील इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता. त्याचप्रमाणे ग्रेव्हीट इंजिनीरिंग वर्क्स मुंबई यांचे प्रतिनिधी देखील प्रशिक्षणाकरीता उपस्थित होते.

या प्रशिक्षणामध्ये दरमहा चांगले काम करणाऱ्या सफाई मित्रांना मासिक उत्कृष्ट सफाई मित्र पुरस्कार प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व सफाई मित्रांना पीपीई किटचे वाटप करण्यात आले.




Most Popular News of this Week

वरळी येथे 158 निरंकारी भक्तांचे...

वरळी येथे 158 निरंकारी भक्तांचे रक्तदानकल्याण : ‘रक्त नाड्यांमध्ये वाहावे,...

सुभाष मैदानातील इनडोअर...

सुभाष मैदानातील इनडोअर गेमच्या हॉलचे काम  क्रीडा प्रेमींनी पाडले...

गावठाणचा प्रश्न कायमस्वरूपी...

 गावठाणचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार; वनमंत्री गणेश नाईकउरण : उरण नवी...

केडीएमसीच्या सिटी पार्क...

केडीएमसीच्या सिटी पार्क येथील चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त...

Epaper 16/01/2025

केडीएमसीच्या सफाई मित्र...

केडीएमसीच्या सफाई मित्र यांच्याकरिता प्रशिक्षणाचे आयोजनकल्याण : कल्याण...