
कचऱ्याला आगी लावण्याचे प्रकार वाढले
कचऱ्याला आगी लावण्याचे प्रकार वाढले
कल्याण : डोंबिवली एमआयडीसी निवासी मध्ये रस्त्याच्या कडेला जमा झालेला कचरा पालापाचोळा व त्यात लोकांनी आणून टाकलेल्या कचऱ्याला काही लोकं आगी लावत असल्याचे दिसत असून त्यामुळे झाडांना धोका पोहोचत आहे. शिवाय या कचऱ्यात प्लास्टिक असल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. या लागलेल्या आगी जवळच पथदिवे असल्याने एखादी दुर्घटना घडू शकते. एकंदर या आगीमुळे होत असलेले झाडांचे नुकसान आणि प्लास्टिक ज्वलनातून होणारे प्रदूषण यामुळे पर्यावरणाच्या समतोल बिघडत असून यावर कडक कार्यवाही कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्वच्छता विभागाने करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. रस्त्यावरील सीसी कॅमेरे तपासले तर हे कचरा जाळणारे अज्ञात व्यक्ती सापडू शकतील.
सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मिलापनगर तलाव जवळ एका पथदीव्याचा खांब आणि पिंपळाच्या झाडाजवळ जमा झालेला कचरा, प्लास्टिक, निर्माल्य याला काही अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याचे पाहण्यास मिळाले. या आगीमुळे पिंपळाचा झाडाला या आगीचा फटका बसला. काही दिवसापूर्वी श्री गणेश मंदिर खत प्रकल्प जवळ जमा कचऱ्याला अशीच आग लावल्याने काही झाडे जळाली असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी दिली.
Most Popular News of this Week
शहापूर तालुक्यात भाजपाची...
माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा भाजपामध्ये प्रवेशशहापूर तालुक्यात...