
महापालिका क्षेत्रात सामाजिक संस्थांच्या मदतीने स्वच्छता विषयक उपाययोजना!
महापालिका क्षेत्रात सामाजिक संस्थांच्या मदतीने स्वच्छता विषयक उपाययोजना!
महापालिका क्षेत्रात सामाजिक संस्थांच्या मदतीने स्वच्छता विषयक उपाययोजना!
कल्याण : महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांचे निर्देशानुसार व अतिरीक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांचे मार्गदर्शाखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन अधिनियमाची तसेच एकल वापर प्लास्टीक बंदी अधिनियमाची चोखपणे अंमलबजावणी होण्यासाठी, महापालिकेमार्फत विविध स्तरावरुन प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येत आहे.
महापालिका क्षेत्रात विलगीकृत कचरा संकलन, कच-याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावणे, जी.व्ही.पी निर्मुलन , एकल वापर प्लास्टीक बंदी कारवाई इ; या नियमीत स्वरुपात करण्यात येत आहेत. याचबरोबर महापालिकेमार्फत विविध अभियान राबवून त्या माध्यमातून स्वच्छता कार्यवाही, तलाव स्वच्छता, निर्माल्य संकलन इ. कार्यवाही देखीलमोठया प्रमाणात करण्यात येत असतात.
सदर कार्यवाही हया अधिक गुणवत्तापुर्वक व परिणामकारक होणे आवश्यक असून याकरीता महापालिका क्षेत्रातील सामाजिक तसेच पर्यावरण क्षेत्रात कार्यरत विविध संस्थाचे सहकार्य लक्षात घेता महापालिका क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन कार्यवाही तसेच एकल वापर प्लास्टीक बंदी कार्यवाही अधिक प्रखरपणे करण्याच्या हेतुने तसेच सदर कार्यवाहीची अंमलबजावणी चोखपणे करणेकामी पुढील उपाययोजना ठरविण्यासाठी महापालिका क्षेत्रातील सामाजिक तसेच पर्यावरण क्षेत्रात कार्यरत विविध संस्थासोबत बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते.
सदर बैठक घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त अतुल पाटील यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली असून बैठकीस घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सहा. आयुक्त प्रिती गाडे, मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलूरकर, परिमंडळ-1चे उप मुख्य स्वच्छता अधिकारी मोहनीश गडे तसेच स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अॅम्बेसीडर डॉ. प्रशांत पाटील, डॉ. रुपींदर कौर यांचेसह विवेकानंद सेवा मंडळ, पर्यावरण दक्षता मंडळ, सक्षम कन्या विकास संस्था, सक्षम नारी सेवाभावी संस्था, सुयश संस्था, उर्जा फांऊडेशन या संस्थाचे प्रतिनीधी यांचेसह महापालिकेचे स्वच्छता अधिकारी, महापालिका क्षेत्रातील कार्यरत पर्यावरण रक्षक हे उपस्थित होते.
या बैठकीमध्ये एकल वापर प्लास्टीक बंदी, विलगीकृत कचरा संकलन, कचरा संकलन व वाहतुकीकरीता आवश्यक नियोजन तसेच याकामी नागरीकांमध्ये जनजागृती तसेच महत्वाच्या विषयांच्या कार्यशाळेचे आयोजन इ.बाबत यशस्वीपणे चर्चा करण्यात आलेली असून या कार्यवाही दरम्यान महापालिका क्षेत्रातील सर्व सामाजिक तसेच पर्यावरण क्षेत्रात कार्यरत विविध संस्थामार्फत महापालिकेस सहकार्य देणेबाबत आश्वासन देण्यात आले.
पुढील कालावधीमध्ये प्रभागक्षेत्र स्तरावर सर्व संस्थाना सहभागी करुन महापालिकेमार्फत जनजागृती कार्यवाही तसेच वेळ पडल्यास दंडात्मक कार्यवाही अधिक प्रखरपणे करण्यात येणार असल्याबाबत विभागाचे उप आयुक्त अतुल पाटील यांचेमार्फत आवाहन करण्यात आले.
Most Popular News of this Week
शहापूर तालुक्यात भाजपाची...
माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा भाजपामध्ये प्रवेशशहापूर तालुक्यात...