Breaking News

तरुणांना अंधश्रद्धा निर्मूलन आणि एड्स जनजागृतीचे धडे

तरुणांना अंधश्रद्धा निर्मूलन आणि एड्स जनजागृतीचे धडे

तरुणांना अंधश्रद्धा निर्मूलन आणि एड्स जनजागृतीचे धडे

कल्याण : श्रीजया आनंद कॉमर्स आणि सायन्स नाईट डिग्री कॉलेज ठाणे आणि कल्याण शाखा, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या विद्यमाने, पानखंडा गाव, ओवळे येथे कॉलेजच्या एनएसएस कॅम्प मध्ये तरुणांना मार्गदर्शन करण्यात आले. 


माजी राज्यसचिव सुशीला मुंडे यांनी अंधश्रद्धा निर्मूलनची गरज काय? दैनंदिन जीवनात आपण कसे अंधश्रद्धेच्या आहारी जातो? आपला विवेक जागृत ठेवण्यासाठी आपण काय केले पाहिजे? हे तरुणांना सांगितले. प्रधान सचिव जिल्हा ठाणे डॉ.सुषमा बसवंत यांनी एच आय व्ही एड्सबाबत विद्यार्थ्याना जागरूक केले. एचआयव्ही एड्स चा प्रादुर्भाव कसा होतो? तो कसा टाळावा? आणि निरोगी जीवनशैली कशी आत्मसात करावी, याचे तरुणांना धडे दिले. 

अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचा विशेष अंक आणि कॅलेंडर कॉलेजला भेट देण्यात आले. प्रा.विनीत, प्रा.कवडे आणि जाधव यांचे या कार्यक्रमाला सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला होता.अनिसची सध्या सभासद नोंदणी सुरू आहे, त्यासाठी देखील तरुणांचा उत्साह दिसला. 



Most Popular News of this Week