Breaking News

स्थायी समितीच्या पहिल्याच सभेत 20 कोटीची 34 कामे मंजुरीस

स्थायी समितीच्या पहिल्याच सभेत 20 कोटीची 34 कामे मंजुरीस

 स्थायी समितीच्या पहिल्याच सभेत 

20  कोटीची 34 कामे मंजुरीस 

कल्याण :- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणूक प्रदीर्घ कालावधीनंतर पार पडल्यावर लोकप्रतिनिधी राजवटीत स्थायी समितीच्या पहिल्याच सभेत विविध ३४ विषय असून सुमारे २० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून ठेवण्यात आल्याने कोटीच्या कोटीची उड्डाणे असलेल्या कामांना मंजुरी देण्यात येणार असल्याचे दिसून येत आहे.

स्थायी समिती ही महापालिकेची सर्वात महत्त्वाची वैधानिक कार्यकारी संस्था आहे. शहराच्या आर्थिक आणि धोरणात्मक निर्णयांवर तिचा थेट प्रभाव असतो. शहराच्या 'आर्थिक तिजोरी'चा खरा कारभार इथेच ठरतो! २५ लाखा पेक्षा अधिक खर्चाच्या कामांना मंजुरी देण्याचे प्रस्ताव स्थायी समितीच्या विषय पटलावर सादर केले जातात. स्थायी समिती सभेच्या पटलावर एकूण ३५ विषय ठेवण्यात आलेले आहेत. 

आजारी रुग्णालयासाठी 12 कोटींचे खुराक 

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बाई रुक्मिणीबाई रुग्णालय व शास्त्री नगर रुग्णालयात नागरिकांना प्राथमिक उपचार करण्यात येतात एखाद्या रुग्णाची मोठी शस्त्रक्रिया करायची असेल तेंव्हा ठाणे येथे पाठविले जाते, अशा वेळी या मध्ये महत्वाचा प्रस्ताव आरोग्य विभागाचे आहेत , पालिकेतील रुग्णालयांना दोन वर्षासाठी लागणाऱ्या आरोग्य साहित्य,औषधे,एक्सरे फिल्म,रसायने, रक्त तपासणी प्रयोग शाळा साहित्य,किट्स तसेच रुग्णालयातील कापड व कपडे धूलाई,शीतपेट्याची समावेशक करार,मेडिकल ऑक्सिजन सिलेंडर भरून देणे , आदी सर्जिकल साहित्य आदी खरेदीच्या १२ कोटी रुपयांच्या निविदाचे प्रस्ताव मंजूरीसाठी ठेवले आहेत. मोठ्या प्रमाणावर आरोग्य सेवा साहित्यावर खर्च केला जाणार असल्याने पालिकेची आरोग्य सेवा सक्षम होणार आहे का हे पाहणे महत्वाच आहे.

डोंबिवली पूर्वेकडील बेघरांसाठी निवारा केंद्र तीन वर्षाच्या देखभाल कालावधी साठी. ९० लाभार्थ्यांना वस्तू व सेवा पुरविणे १ काेटी २७ लाखाचा विषय पटलावर आहे. महापौर निवासस्थान दुरुस्तीकरीता ५७ लाख रुपयांची निविदा मंजूरीसाठी आहे. माणेरे येथील सरकारी जागे भोवती तसेच काटेमानिवली येथील सरकारी भूखंडास संरक्षक भिंत बांधण्याकरीता १ कोटी रुपये खर्चाचा विषय आहे.

 महापालिकेच्या ९ प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या हद्दीतील नालेसफाईच्या कामाची ३ कोटी ४१ लाख रुपयांची निविदा काढण्याचा विषयही पटलावर आहे. या सहा अन्य विविध विषयांचा समावेश आहे. पालिकेची पहिलीच स्थायी समितीची सभेत कोट्यावधी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जाणार आहे.


Most Popular News of this Week

स्थायी समितीच्या पहिल्याच...

 स्थायी समितीच्या पहिल्याच सभेत 20  कोटीची 34 कामे मंजुरीस कल्याण :- ...